AGRO TOURISM | कृषी पर्यटन : शेतकर्‍यांसाठी एक शाश्वत उतपन्नाची सुवर्णसंधी

कृषी पर्यटन (Agro tourism)-

सध्या खुप शेतकरी कृषी पर्यटनाच्या माध्यमातून भरपूर उत्पन्न कमवत आहेत. एकेकाळी शेती पर्यटन हे खुपच छोटे क्षेत्र होते जे आता वेगाने वाढत आहेत. सध्याच्या धावपळीच्या जीवनात कृषी पर्यटनाला सर्व जगभरातुन प्रतिसाद भेटत आहे शिवाय पर्यटन मंत्रालय देखील या क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन (government subsidy for agri tourism) देत आहे

मागील 2-3 वर्षात बरेच कृषी पर्यटन केंद्र (agro tourism project) शहरांच्या आसपास तयार झाले आहेत. शहरामधील खुप सार्‍या शाळा अश्या ठिकाणी मुलांच्या सहलीचे आयोजन करत आहेत ज्यामधुन मुलांना ग्रामीण जीवनविषयी माहिती मिळते. गाय, म्हैस, बैल, वासर, शेळ्या, कोंबड्या इ. पशु, पक्षी यांच्या सोबत वेळ घालवता येतो. बरेच शहरी कुटुंब आपल्या पाल्यांना घेऊन अशा कृषी पर्यटन केंद्रावर कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवण्यासाठी जात आहेत. भारत सरकार तसेच महाराष्ट्र शाशनाने देखील या क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण विकासाची क्षमता ओळखली आहे म्हणूनच सरकारने आपल्या पर्यटन धोरणात (agri tourism policy in india) कृषी पर्यटनाला महत्व दिलेले आहे.

ॲग्रो टुरिजम म्हणजे काय? (What is Agro Tourism?)

ॲग्रो टुरिजम किंवा ॲग्री टुरिजम म्हणजे पर्यटकांना शेतामध्ये राहण्याची, जेवणाची, करमणुकीची आणि सर्वात महत्वाच म्हणजे शेती संबंधी कामे अनुभवण्याची सोय करणे होय. कृषी पर्यटनामध्ये पर्यटक हे गावातील लोकांचे जीवन जगतात, जसे की गायीचे दूध काढणे, ट्रॅक्टरने नांगरणी करणे, विहिरीमध्ये पोहणे, झाडावर चढून फळे तोडून खाणे आणि अस्सल गावरण जेवणाचा आनंद घेत असतात.

भारतातील ॲग्रो टुरिजम (Agro tourism in India)

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, जवळपास 70 टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या शेतीवर अवलंबून आहे. तसेच भारताच्या जीडीपी मध्ये शेती क्षेत्राचा वाटा जवळपास 25 टक्के आहे. जागतिक स्तरावर पर्यटन क्षेत्र हे दर वर्षी 4 टक्क्याने वाढत आहेत तर भारतीय पर्यटन क्षेत्र दर वर्षी 10.1 टक्के या दराने वाढत आहे, त्यामुळे कृषी पर्यटन ही भारतीय शेतकर्‍यांसाठी खुप मोठी संधी आहे. विशेषता: महाराष्ट्रामध्ये याचा प्रसार मोठ्या वेगाने होत आहे. पर्यटनामुळे रोजगार निर्मिती होते, गरीबी कमी होण्यास मदत होते तसेच शाश्वत मानव विकासाला सुद्धा चालना मिळते

कृषी पर्यटनामधील संधी (Scope in Agro Tourism)

 • कमी खर्चात होणारे पर्यटन

  कृषी पर्यटनामध्ये राहण्याचा, जेवण्याचा, प्रवासाचा आणि मनोरंजनाचा खर्च हा सर्वात कमी असतो. कृषी पर्यटन हे कमी खर्चिक असल्यामुळे जास्तीत जास्त लोक त्याचा आनंद घेऊ शकतात.

 • ग्रामीण जीवन आणि शेती विषय असणारी लोकांची कुतूहलता

  शहरात राहणारा लोकांना ग्रामीण जीवनाविषयी खूप कुतूहलता असते. ग्रामीण भागात आढळणारे पशु, पक्षी, फळे, झाडे, ग्रामीण भागातील लोकांची भाषा त्यांची संस्कृती इत्यादी विषयी जाणून घेण्याची त्यांची इच्छा असते.

 • शहरी भागातून कृषी पर्यटनाला असलेली मोठी मागणी

  सध्याच्या धावपळीच्या जीवनात कृषी पर्यटन हे सर्व वयाच्या लोकांना जसे की, लहान मुले, जॉब करणाऱ्या व्यक्ती आणि वयोवृद्ध आजी आजोबा यांना मनोरंजनाचे उत्तम साधन आहे. ग्रामीण भागातील खेळ, सन तेथील अस्सल गावराण जेवण आणि ग्रामीण निसर्ग हे संपूर्ण कुटुंबाला विविध मनोरंजनाचे मार्ग पुरवतात.

 • लोकांची आरोग्याविषयी असलेली जागरूकता

  प्रक्रिया केलेले भेसळयुक्त अन्नपदार्थयांचे आहारातील प्रमाण वाढले आहे त्यामुळे शहरी भागातील लोकांचे जीवनमान ढासाळत चाललेल आहे. त्यामुळे लोक सेंद्रिय पदार्थ म्हणजेच कोणतेही रासायनिक घटक न वापरता बनवलेले अन्नपदार्थ याकडे वळत आहेत. कृषी पर्यटनामध्ये सेंद्रिय शेतीला खूप महत्त्व दिले जाते. त्यामुळे लोकांचा कल कृषी पर्यटनाला भेट देऊन तेथील सेंद्रिय पदार्थ खरेदी करण्याकडे वाढला आहे.

 • धावपळीच्या जीवनात लोकांना पाहिजे असलेली शांतता आणि एकांतपणा

  शहरी भागातील लोकांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कामाचेच टेन्शन असते.सर्वजण पैसे कमावण्याच्या जीवघेण्या शर्यतीत अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांना शांती आणि एकांतपणा सहसा लाभत नाही त्यामुळे सुट्टीच्या कालावधीत कृषी पर्यटन हे मनोरंजनाचे आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याचा एक चांगला आणि स्वस्त पर्याय म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

कृषी पर्यटनाची गरज आणि महत्त्व (Need and Importance of Agri Tourism)

कृषी पर्यटनामध्ये शेती संबंधित गोष्टी प्रत्यक्ष अनुभवायला मिळतात त्यामुळे आपण निसर्गाच्या जवळ जातो तसेच शाश्वत विकासासाठी कृषी पर्यटन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या भारतीय शहरे प्रदूषण आणि प्रचंड गर्दी या समस्येला तोंड देत आहे. ऍग्रो टुरिझम हे या समस्येवर समाधान आहे. त्यामुळे कृषी पर्यटनाला खूप महत्त्व आले आहे.

कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा एक नवीन मार्ग मिळतो. ग्रामीण जीवनाला सन्मान मिळतो तसेच ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतात. शहरी भागातील लोकांना त्यांच्या धकाधकीच्या जीवनातून निवांत वेळ घालवण्याची संधी मिळते.

निसर्ग हा भिंती नसलेली शाळा आहे त्यापासून नवीन नवीन गोष्टी शिकता येतात सध्या शहरी मुलांचे जीवन हे शाळा, क्लासेस, कार्टून चैनल, टीव्ही, मोबाइल गेम, चॉकलेट, फास्ट फूड, कम्प्युटर, इंटरनेट या भोवती फिरत आहे त्यामुळे त्यांना निसर्गा विषयी अत्यंत कमी माहिती आणि अनुभव आहे . या मुलांना कृषी पर्यटनाला घेऊन गेल्यास तेथे त्यांना नवीन नवीन गोष्टी पाहायला अनुभवायला मिळतील त्यातून ते बऱ्याच नवीन गोष्टी शिकतील त्यांची विचार करण्याची क्षमता वाढेल ग्रामीण भागातील लोकांना जवळून समजून घेण्याची संधी मिळेल त्यामुळे कृषीपर्यटनाला येणाऱ्या काळात खूप संधी निर्माण होणार आहेत आणि त्यातून सर्वांगीण विकास होईल.

Leave a Comment